सध्या राज्याच्या राजकारणात पहाटेच्या शपथविधीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. देवेंद्र फडणवीस याविषयीचा नवनवीन खुलासे करत आहेत. फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच मी अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता, असे विधान केले. फडणवीसांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच पुण्यात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पिक्चर अभी बाकी है असे सांगून आपण आणखी गौप्यस्फोट करणार आहोत, याचे संकेत दिले.
या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, मी अजून अर्धच बोललो आहे. दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेले जे काही आहे, ते सांगेन, असे विधान देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. मी एवढेच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका…म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही.
(हेही वाचा जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; समर्थकांकडून महापालिका अधिकाऱ्याला मारहाण)
पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेल जे काही अर्ध आहे, ते दुसरी योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धदेखील बोलेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवाय फडणवीस आणखी काय बोलणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Join Our WhatsApp Community