भाजप- शिंदे गटात तुफान राडा; दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी

155

अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. तर काही वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना अहमदनगर पुणे रोडवरील केडगाव येथील रंगोली हाॅटेल समोर घडली.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

याप्रकरणी विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिलेसह अज्ञात 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लग्न समारंभात अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे ओंकार सातपुते यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. यानंतर सातपुतेंच्या मालकीचे हाॅटेलवर कर्डिलेंच्या मुलाने आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हाॅटेलमध्ये आलेले काही ग्राहकही जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

( हेही वाचा: Russia Ukraine War: असे युद्ध जे तब्बल 675 वर्षे चालले )

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.