राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह बाजू मांडत आहेत. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे अॅड. मनिंदर सिंह यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. सिंह म्हणाले की, आमदारांना चौदा दिवसांची नोटीस दिल्याशिवाय त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. तसेच, आमदारांना पाच वर्षांचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. त्यामुळे आमदारांचा हा अधिकार अध्यक्ष काढून घेऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद सिंह यांनी केला आहे.
(हेही वाचा: भाजप- शिंदे गटात तुफान राडा; दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी )