Pakistan Train Blast: पेशावरहून क्वेटाला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; दोन प्रवासी ठार, चार जखमी

181

पाकिस्तानच्या क्वेटाला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसमध्ये गुरुवारी स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, जेव्हा जाफर एक्सप्रेस चिचावतनी रेल्वे स्थानकातून जात होती, तेव्हा हा स्फोट झाला. हा स्फोट भीषण असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

…यामुळे झाला स्फोट

पाकिस्तानच्या रेल्वे विभागाचे प्रवक्ते बाबर अली यांनी डॉन वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, जाफर एक्सप्रेसच्या बोगी नंबर ४ मध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली आहे. या रेल्वेतील एक प्रवासी सिलेंडर घेऊन प्रवास करत होता. त्याने सिलेंडर शौचालयात लपवला होता. याच सिलेंडरचा स्फोट झाला.

दरम्यान या स्फोटानंतर घटनास्थळी बॉम्बशोधक पथकासह बचाव पथकही पोहोचले आहे. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आता तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून रेल्वे ट्रॅक बंद करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि दहशतवाद विरोधी अधिकारी घटनास्थळाहून पुरावे गोळा करत आहेत.

(हेही वाचा – अमेरिकेतील अलाबामामध्ये लष्करी विमान कोसळले; पायलटसह 2 ठार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.