सॅमसंगचा नवा गेमिंग मॉनिटर पाहिलाय का? ग्राफिक्ससाठी आहे सर्वोत्कृष्ट!

157

इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या सॅमसंग या कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी खास मॉनिटर लॉंच केला आहे. आपल्या उपकरणाने सॅमसंगने भारतीयांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेषतः सॅमसंगचे मोबाईल हे टिकाऊ असतात. आता सॅमसंगने सॅमसंगने भारतात ओडिसी गेमिंग मॉनिटर्सची नवीनतम श्रेणी लॉन्च केली आहे. वापरकर्त्यांसाठी यामध्ये अनेक आश्चर्यकारक फीचर्स असणार आहेत.

आता सादर केलेल्या ओडिसी ओएलईडी जी८, ओडिसी जी७ और जी७ नियो हे ओडिसी गेमिंग मॉनिटर सीरीजची नवीनतम आवृत्ती आहे. यामध्ये नियो क्वांटम प्रोसेसर, एसडीआर ट्रू ब्लॅक ४००, स्मार्ट एंटरटेनमेंट आणि एएमडी फ्री सिंक प्रीमियम प्रो असे अत्याधुनिक फीचर्स आहेत. ओडिसी ओएलईडी जी८ चा जीटीजी ०.१ एमएस आणि १७५ हर्ट्जच्या रीफ्रेश दरासह संपूर्ण ओडिसी श्रेणीमध्ये सर्वात जलद रिस्पॉन्स टाईम मिळतो.

अल्ट्रा-वाइड, क्यूएचडी रिझोल्यूशन २१:९ गुणोत्तरासह ३४-इंच स्क्रीन वापरकर्त्यांना उत्कृष्ट चित्र गुणवत्ता प्रदान करते. इनबिल्ट एंटरटेनमेंट हब वैशिष्ट्यांसह वापरकर्ते गेमिंग मॉनिटरला फक्त एका क्लिकवर स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकतात. त्यामुळे हा मॉनिटर वापरकर्त्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे. यामुळे अल्टिमेट प्रीमियम गेमिंग अनुभव तर मिळतोच त्याचबरोबर व्हिज्युअलसाठी १००% कलर व्हॉल्यूम आणि डीसीआय-९९.३% कल गॅमेटदेखील मिळतो.

( हेही वाचा: रावणासोबत व्यायाम करा आणि रावणासारखी बॉडी बनवा; पहा हा व्हिडिओ )

हा अद्वितीय मॉनिटर तुम्ही सर्व दुकानांतून खरेदी करु शकता. हा गेमिंग मॉनिटर वापाकर्त्यांना सर्वच प्रकारचा अनुभव प्रदान करतो. भारतात जी८ मॉनिटरची सिल्व्हर रंगाची किंमत १७५,००० रुपये इतकी आहे. ओडिसी नियो जी७ ४३ इंचाची किंमत १३०,००० रुपये असून ३२ इंचाची किंमत १ लख रुपये आहे. तसेच ओडोसी जी७ ची किंमत ७५,०००/- रुपये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.