नैसर्गिक आपत्तींचा पूर्व अंदाज घ्यायला शिकायचे, तर ही संधी सोडू नका, ISRO चा येतोय मोफत कोर्स

139

सध्या जगात नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत, विशेषतः भूकंप, अतिवृष्टी, अवर्षण यामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून जात आहे. याचा पूर्व अंदाज घेणे शिकता आले तर नुकसान टाळता येईल.  isro ने पुढाकार घेतला आहे. देशवासियांना हे ज्ञान देऊन त्यांना सजग करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी isro ५ दिवसांचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पहिला येईल त्याला पहिले प्राधान्य देण्यात येणारे आहे. वायुमंडलीय आणि सागरी धोके यांच्याशी संबंधित रिमोट सेन्सिंग (आरएस) आणि जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिमबाबत (जीआयएस) असा हा अभ्यासक्रम असणार आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस) ही संस्था इस्रोच्या सहकार्याने हा कोर्स आयोजित करत आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले जात आहेत.

हा आरएस आणि जीआयएस कोर्स 27 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू होईल आणि 3 मार्च 2023 रोजी संपेल. केंद्र आणि राज्य सरकारचे सदस्य, अधिकारी, शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि तज्ज्ञ, ऑपरेशनल आणि संशोधन संस्था व संशोधकांसाठी हा कोर्स आहे. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण होणारा हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. कोर्समध्ये सहभाग घेणाऱ्यांना, लेक्चर स्लाइड्स आणि व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स यांसारखं स्टडी मटेरियल ई-क्लासद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. कोर्समध्ये 70 टक्के उपस्थिती असणाऱ्यांना कोर्स पूर्ण झाल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येईल.

(हेही वाचा कॅनडात वर्षभरात चौथ्यांदा हिंदू मंदिराची विटंबना)

कसा घ्याल प्रवेश? 

कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या संघटना, विद्यापीठे, विभाग आणि संस्थांनी स्वत:चा एक समन्वयक नेमला पाहिजे. या समन्वयकाला आयआयआरएसच्या वेबसाईटवर त्याच्या किंवा तिच्या संस्थेची नोडल सेंटर म्हणून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नोंदणी झालेले सहभागी आयआयआरएस-इस्रोच्या ई-क्लास प्लॅटफॉर्मद्वारे कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात. वायुमंडलीय आणि सागरी धोके यांच्याशी संबंधित रिमोट सेन्सिंग (आरएस) आणि जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिमबाबत (जीआयएस) कोर्स केल्यानं चक्रीवादळं, अतिवृष्टी, अवर्षण यांसारख्या घटनांचा अंदाज लावण्यास मदत होईल. त्यामुळेच, ज्या व्यक्ती या नैसर्गिक आपत्तींशी संबंधित ठोस निर्णय घेण्यास जबाबदार आहेत, अशा सरकारी अधिकारी आणि प्रतिनिधींना या कोर्समध्ये सहभागी होण्याचं आवाहन इस्रोच्या वतीनं करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.