राज्यात शुक्रवारपासून थंडीचा जोर कमी होणार आहे. किमान पाच दिवस राज्यात थंडीसाठी अनुकूल वातावरण नाही. पण २२ फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.
शुक्रवारपासून राज्यातील किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल. किमान तापमान साधारणतः २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात थंडीचा कडाका कमी राहील. राज्यात थंडीसाठी आवश्यक असणारा उत्तरेकडील पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सध्या प्रभावी नाही. पश्चिमी प्रकोप येत्या १८ फेब्रुवारीला उत्तर भारतात पुन्हा सक्रीय होईल. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. मग तीन दिवसानंतर त्याचा प्रभाव राज्यात दिसून येईल. २२ फेब्रुवारीला राज्यात किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली घसरेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ खुळे यांनी वर्तवला. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेत नियोजन करावे, कांदा लागवडीचे सिंचन माफक पाण्यावर किंवा रात्री करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
(हेही वाचा – ‘आरे’ तील वृक्षतोडीला राज्य सरकारने याचिकाकर्त्यालाच ठरवले जबाबदार)
Join Our WhatsApp Community