अभिमानास्पद: भारतीय वंशाचे नील मोहन युट्युबचे नवे CEO; सुदर पिचाईंसोबत करणार काम

202

युट्यूबच्या सीईओ (Youtube CEO) सुसान वोजिकी (Susan Wojcicki) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी ही माहिती दिली. युट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफाॅर्म आहे. भारतीय वंशाचे नील मोहन आता युट्यूबचे पुढील सीईओ असतील, असे कंपनीने म्हटले आहे. नील मोहन यु्ट्यूबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत.

नील मोहन सध्या YouTube चे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी यु्ट्यूबसोबत काम सुरु केले. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइनुसार, नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे आणि त्यांनी एक्सचेंज कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

( हेही वाचा: Income Tax Raid: आयकर विभाग छापे टाकतो म्हणजे नेमके काय करतो? जाणून घ्या सविस्तर )

जगातील टेक कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचे नेतृत्व

निल मोहन यांची नियुक्ती ही सिलिकाॅन व्हॅलिमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा प्रभाव दर्शवते. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई हेदेखील भारतीय वंशीचे आहेत. मायक्रोसाॅफ्टचे सीईओ सत्या नडेला, अॅडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांच्यासह जगातील अनेक मोठ्या-टेक कंपन्यांचे नेतृत्त्व सध्या भारतीय वंशाचे लोक करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.