शिवसेनेच्या माजी मंत्र्याने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. भाजप- सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी 37 वर्षीय महिलेने शासकीय विश्रामगृहातच चक्क बलात्कार केल्याचा गुन्हा बिबडेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
( हेही वाचा: काव्यातून अनेकदा दाखवला काँग्रेसला आरसा; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांचा अनोखा अंदाज )
जीवे मारण्याची धमकी दिली
माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी महिलेला लग्नाचे आणि मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून शासकीय विश्रामगृहात बोलावून बलात्कार केला. तसेच, महिलेला पट्ट्याने मारुन, पळून जाऊ नये म्हणून चाकूचा धाक दाखवला. या सर्वांमधून महिला गर्भवती राहिली. त्यानंतर महिलेला मुलगा झाला. यात मुलाला सांभाळण्यासाठी मंत्र्याने महिलेला चेक दिला मात्र तो चेक बाऊंस झाला. कोणाला काही सांगशिल तर मारुन टाकेन, अशी धमकी देखील खंदारे यांनी दिल्याने महिला बरेच दिवस गप्प होती, असा आरोप महिलेने केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
Join Our WhatsApp Community