राज्यातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या बेंचकडे द्यायचे की नाही? यावरही मंगळवारी निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सध्या रत्नागिरीत आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आमच्यादृष्टीने बंडखोर सर्व आमदार हे अपत्रा आहेत. फक्त निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यावे म्हणून आम्ही प्रयत्न करु. शेवटी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे हे घटनापीठाला ठरवावे लागले, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: महाराष्ट्र सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला; मोठ्या खंडपीठासंदर्भातील निर्णय होणार )
Join Our WhatsApp Community