राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली होती. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मला तुरुंगात डांबून जीवे मारण्याचा यांचा डाव होता, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले की, पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. मात्र, हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी तिचा तपास नि:पक्षपाती होईल का अशीच शंका आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आले. त्या पेट्रोल पंप आणि त्या आजूबाजूचे 3-4 सीसीटीव्ही एकाच वेळी बंद कसे, असा मोठा सवालही राऊत यांनी उपस्थिती केला. म्हणजेच, स्थानिक पोलिसदेखील दबावात काम करत असल्याची टीका राऊत यांनी केली. एवढेच काय माझ्यासारख्या माणसालाही तुरुंगात डांबून जीवे मारण्याचा त्यांचा डाव होता, असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
( हेही वाचा: भाजप गिरीश बापटांच्या जिवाशी खेळतंय, यावर बावनकुळे म्हणाले,… )
Join Our WhatsApp Community