चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भाजपाचा जोरदार प्रचार सुरू आहे. मोठ्या आजाराशी झगडत असतानाही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन भाजपा खासदार गिरीश बापट प्रचारासाठी मैदानात उतरले. याच मुद्द्यावरून सध्या भाजपावर निशाणा साधला जात आहे. गिरीश बापट यांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय, असा आरोप राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. या आरोपावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया आहे.
आरोपावर काय म्हणाले बावनकुळे?
नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘प्रशांत जगतापांनी याबाबत बोलू नये. मी बापट यांना भेटलो. तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की, जेव्हा माझी गरज पडेल, तेव्हा मी पक्षासाठी मैदानात उतरेन. ज्यावेळेस निवडणुकीचा अर्ज दाखल केला त्यावेळेसही मी त्यांच्याकडे जाऊन आलो होतो. आता विरोधक काहीतरी आरोप करायचे म्हणून करतात. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांनी रुग्णवाहिकीने जाऊन मतदान केले होते. गिरीश बापट हे देवदुर्लभ नेते आहेत. त्यांना नमन करतो. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ऑक्सिजन लावून आवाहन केले, हे भाजपाचे संस्कार आहेत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाला काय देता येईल, याचा विचार करतो.’
(हेही वाचा – ‘लोकशाहीत बहुमताला महत्त्व’; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community