अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरूवारी रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये जवळपास ८८ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
( हेही वाचा : मोठी बातमी: BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा)
८८ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
या सर्व विद्यार्थ्यांवर शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अमरावतीमधील दर्यापूर तालुक्याच्या आदर्श हायस्कूलची सहल शिर्डीला आली होती. यामध्ये इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण २३० विद्यार्थी सहलीला आले होते.
या विद्यार्थ्यांची नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सहलीच्या ठिकाणी रात्री जेवणानंतर मुलांची प्रकृती बिघडली. रात्री जेवण केल्यानंतर ८८ विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचाय त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, दरम्यान सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community