पहाटेच्या शपथविधी नाट्यात आणखी एका नेत्याची एन्ट्री; कोण आहे तो नेता?

148

२०१९ साली एका बाजूला शिवसेनेने भाजपाची साथ सोडून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा घाट घातला होता, त्याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. अजित पवार थेट देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि पहाटेच शपथविधी उरकला. या शपथविधीबाबत कुणाकुणाला होती, याचे खुलासे आता अनेक नेते करत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांचीही नावे आली आहेत, आता त्यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट? 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊत यांना देखील माहिती होती. संजय राऊत पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते. त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यामागे संजय राऊत यांचा मोठा वाटा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत सायको आहेत, ते कधी काय बोलतील आणि कोणाला अडचणीत आणतील हे सांगताच येत नाही. उद्धव ठाकरे यांची जी अडचण वाढली आहे, ती फक्त या सायको भुमिकेने झाली आहे. संजय राऊत वक्तव्य करतात आणि ते निस्ताराचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे. तर सायकोपणा करणे आणि जे घडले नाही त्यावर भाष्य करणे यात राऊत यांना आनंद मिळत असल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले.

(हेही वाचा तुरुंगात डांबून मला जीवे मारण्याचा डाव होता; राऊतांच्या विधानाने खळबळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.