जेथे जेथे डाव्यांचे आंदोलन असेल, तेथे तेथे अभिनेत्री स्वरा भास्करची उपस्थिती हे समीकरण ठरले आहे. मग ते जेएनयुतील आंदोलन असेल अथवा मोदी सरकारच्या विरोधातील समाजवादी, साम्यवादाचे आंदोलन असेल त्याला पाठिंबा देण्यात स्वरा पहिली असते. त्यामुळे कायम वादात सापडणारी स्वरा पुन्हा एकदा हटके करायला गेली आणि वादात सापडली आहे. तिने समाजवादी पक्षाचा नेता फहद अहमदसोबत विवाह केला आहे. मात्र हा लव्ह जिहाद म्हणून हिंदुत्वनिष्ठांनी त्याला विरोध केल्याचं आश्चर्य वाटले नसते, परंतु या विवाहाला मुस्लिम समाजातूनच विरोध होऊ लागला आहे. सोशल मीडियात हा विवाह इस्लाममध्ये कबूल नाही, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
अभिनेत्री स्वराने आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. यात काहींनी तर मुस्लिम धर्मातील कुराण ग्रंथातील काही वचनांचा आधार घेत स्वराने केलेले लग्न हे कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा रीतीने स्वरा सोशल मीडियात आता ट्रोल होताना दिसते आहे. डॉ. यासीर नदीम अल वाजदी यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. त्यामध्ये त्यांनी स्वराने केलेले लग्न हे इस्लाममध्ये कशाप्रकारे वैध नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी कुराणमधील काही दाखले दिले आहे. त्यांचे ते ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.
काय आहे ते ट्विट?
डॉ.यासीर यांच्या त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वरा ही काही मुस्लिम नाही. आणि जर तिचा पती हा मुस्लिम असेल तर ते लग्न वैध नाही. अल्लाहने म्हटले आहे की, बहुदेववादी अर्थात एकापेक्षा जास्त देवांची पूजा करणाऱ्या महिलेसोबत लग्न हे आपल्या धर्मात वैध नाही. जोपर्यत ती महिला त्या देवांवर श्रद्धा ठेवत असेल अथवा त्यांची पूजा करत असेल. याशिवाय त्या महिलेने लग्नाच्यावेळी इस्लाम स्विकारण्याविषयी शपथ घेतली असेल तरीही ते लग्न ग्राह्य नाही, असे यासीर यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/tanwani_sanjay/status/1626455537943732226?s=20
Join Our WhatsApp Community