कसबा पेठे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी भाजपाचे खासदार गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मैदानात उतरले होते. यावेळी त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी आणि हाताला ऑक्सिमीटर लावण्यात आले होते. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. पण अशातच दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे आता भाजपात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गिरीश बापट यांनी २५ वर्षे कसब्याचे प्रतिनिधित्व केले आणि मुक्ता टिळक यांनी २०१९ पासून कसब्याची धुरा सांभाळली होती. त्यामुळे कसबा भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. आता हा बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान हेमंत रासनेंसमोर आले आहे. आगामी पोटनिवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्या मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
(हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचं मला महत्त्व वाढवायचं नाही – शरद पवार)
Join Our WhatsApp Community