Kasba By-Election 2023: पवारांना या वयातील फिरवणे अमानवीय नाही का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

107

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत २००६ पासून बिघडलेली आहे. त्यानंतरही ते पक्षासाठी फिरत आहेत. त्यांच्या पक्षात शरद पवार हे एकच कार्यकर्ता आहे. बाकी केवळ भाषणे करणारे नेते आहेत. या वयातही प्रचारासाठी त्यांना कसब्यात बोलावण्यात आले. त्यांना असे फिरवणे अमानवीय नाही का? असा सवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उपस्थित केला आहे.

ही निवडणुक भाजप विरुध्द काँग्रेस

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कसबा विधानसभा पाेटनिवडणुक ही केवळ दाेन राजकीय पक्षातील उमेदवारांपुरती मर्यादित निवडणुक नाही. तर, ही विधानसभेची निवडणुक आहे. त्याठिकाणी राज्याचे कायदे तयार हाेतात. राज्याची विविध धाेरणे ठरतात आणि त्यामुळे ही निवडणुक भाजप विरुध्द काँग्रेस आहे.’

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन पक्ष एकत्रित असले तरी त्यात काँग्रेसची काेणतीच भूमिका नव्हती. बाकी दाेघे सत्तेचा लाभ घेत हाेते. हीच परिस्थिती पुन्हा कसबा मधील काँग्रेस उमेदवारीच्या प्रचारात दिसून येत असल्याची टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – गिरीश बापटांची प्रकृती खालावली, रुग्णालयात केले दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.