फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी दिले टार्गेट; म्हणाले…

180

भाजपने आतापासूनच २०२४ साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजपचे टार्गेट सेट करू लागले आहे. राज्याचे भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी १५० चे टार्गेट ठेवावे, असे आवाहन केले आहे. फडणवीस हे नागपूरमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना उद्देशून भाषण करत होते. नगरसेवकांचेही त्यांनी आपल्या खास शैलीत कान टोचले.

नागपूरमध्येही भाजपची काँग्रेस होण्याची भीती 

मी गृहमंत्री आहे. मला चांगलेच ठाऊक आहे की, कोण काय काम करते? माझे सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष आहे. काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष झाला आणि त्यानंतर कागदावरचा पक्ष झाला आहे. मला भीती आहे की नागपूरमध्ये भाजपाची हीच अवस्था होणार का? माझे व्यवस्थित सगळ्यांकडे लक्ष आहे. त्यामुळे कुणीही असे समजू नका मी लक्ष देत नाही. जे माजी आहेत त्यांना आजी नगरसेवक व्हायचे आहे. अनेकांचा व्यवहार मालक आहोत असा आहे. हे चालणार नाही. काही जण नेत्यांची माणसे आहेत. आपला स्वतःचा सवतासुभा आहे त्यांना पक्षाशी काही घेणेदेणे काही नाही. असे बिलकुल चालणार नाही, हे लक्षात ठेवा असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Swara Fahad Ahemad Wedding ; स्वराचा विवाह इस्लाम कबुल नाहीच; सोशल मीडियात चर्चेला उधाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.