तुमच्या मुलांना परीक्षेचं टेन्शन येतं? मग ‘हे’ करुन पहा

147

वर्षभर मुलं अभ्यास न करता खेळत राहतात परीक्षा जवळ आली की त्यांना टेन्शन येतं. काही मुलांचा अभ्यासही झालेला असतो परंतु परीक्षेच्या नावाने मात्र ते घाबरतात. पालकांना वाटतं की मुलांचा अभ्यास झालेला नसावा किंवा अभ्यास न करण्यासाठी ते नाटक करत आहेत. परंतु आपण आपल्या मुलांची मानसिकता समजून घेतली पाहिजे.

( हेही वाचा : फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी दिले टार्गेट; म्हणाले… )

‘एक्झाम स्ट्रेस’

आपली मुलं परीक्षेला का घाबरतात हे समजून घेतलं पाहिजे. खरं तर या अवस्थेला ‘एक्झाम स्ट्रेस’ असं म्हणतात. एक्झाम स्ट्रेस घेतल्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे सर्वात आधी त्यांना मानसिक तणाव वाटेल असं काही बोलू नका. घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवा. घरात तणावाचं वातावरण असेल तर मुलांना आणखी ताण येऊ शकतो.

या गोष्टी कराव्याच लागतील

मुलांच्या एक्झाम स्ट्रेसचं प्रमुख कारण हे पालकच असतात. परीक्षेत एवढेच मार्क मिळाले पाहिजेत, नापास झालास तर बोर्डिंगला टाकू वगैरे टोलेबाजींमुळे मुलं मनातल्या मनात घुसमटत राहतात. वरवर पाहता ते सर्वसामान्यांसारखे वागत असले तरी मनात मात्र जखम झालेली असते. त्यामुळे परीक्षेवरून त्यांच्यावर दबाव टाकू नका. निकाल काहीही लागला तरी तुम्ही नेहमीच त्यांच्यासोबत असणार आहात हा विश्वास त्यांच्यात निर्माण होऊ द्या. याचा अर्थ तुम्ही मुलांना परीक्षेत नापास व्हायला प्रोत्साहन देता असा होत नाही तर परीक्षेत नापास झाल्याने आयुष्य थांबत नाही असा याचा खरा अर्थ आहे.

मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या. बर्‍याचदा पौष्टीक आहार घेत नसल्यामुळे देखील अभ्यासात लक्ष लागत नाही. त्याचबरोबर मुलांना खेळायला पुरेसा वेळ द्या. मुलांचा सर्वांगिण विकास व्हायला हवा हे लक्षात असू द्या. सतत अभ्यास करत राहिल्यामुळे मेंदू थकतो म्हणून अधूनमधून त्यांच्या मनाजोगे काम करायला द्या. मुलांना परीक्षेतही आनंद वाटायला हवा त्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.