लोअर परळमधील रघुवंशी मिलमध्ये आग

123

लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गावरील बिग बाजार जवळील रघुवंशी मिल कंपाऊंड मध्ये तीन मजली बांधकामांमध्ये आगीची दुघर्टना घडली. या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी नसल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : “केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष…” निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितले)

लोअर परळमधील रघुवंशी मिलमध्ये आग

लोअर परेल सेनापती बापट मार्गावरील रघुवंशी मिल कंपाऊंड येथील तळ अधिक तीन मजल्याच्या एका बांधकामामध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता आग लागण्याचा प्रकार घडला. ही आग दुसरा व तिसरा मजल्यापर्यंत पोहोचली. यामध्ये दोन्ही मजल्यांवरील साहित्यांची मोठी हानी झाली आहे. या आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान ९ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्याठिकाणी मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे उपस्थित असल्याने त्यांनीही या बचाव कार्यामध्ये सहभाग नोंदवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. ही आग कशामुळे लागली याबाबत कोणतेही कारण स्पष्ट झाले नसून यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान ही आग सव्वा आठ वाजता आटोक्यात आल्याची माहितीही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.