माथेरानच्या ‘राणी’ला पर्यटकांची पसंती! ५ महिन्यांमध्ये २९ लाखांचे उत्पन्न

181

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा सुरू झाली. तेव्हापासून निसर्गाचा आनंद लुटण्याचा आनंद देणाऱ्या या टॉय ट्रेनमधून प्रवासी माथेरान हिल स्टेशनवर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. माथेरान टॉय ट्रेनला ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये तब्बल २९ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

( हेही वाचा : देशातील ‘या’ भागाचे तापमान ४० अंशावर! पुढचे दोन दिवस उष्णता आणखी वाढणार, काय काळजी घ्याल?)

माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांची पसंती

ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ – एकूण तिकीट विक्री – २१ हजार २४०

  • व्हिस्टाडोम तिकिटे विक्री – १ हजार ३४० ( ९ लाख २९ हजार ३४० रुपये )
  • प्रथम श्रेणी तिकिटे – १ हजार ८४९
  • द्वितीय श्रेणी तिकिटे – १८ हजार ५१
  • तिकिट विक्रीतून उत्पन्न – २९ लाख रुपये

याशिवाय, मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा चालवते. अलिकडेच, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या फायद्यासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडण्याची घोषणा केली. टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच हा आठ आसनी कोच असेल आणि नेरळ ते माथेरान परतीच्या प्रवासासाठी तसेच रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठीही हा कोच उपलब्ध असेल. आगामी सुट्टीचा हंगाम पर्यटकांसाठी उत्तम असेल आणि सलून कोचसाठी इच्छुक असलेल्यांनी बुकिंगसाठी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.