…म्हणून एकनाथ शिंदे करणार नाहीत ‘शिवसेना भवन’वर दावा!

159

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केल्यानंतर त्यांच्याकडून ‘शिवसेना भवन’चा ताबा घेतला जाईल, असा कयास बांधला जात होता. परंतु, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी ‘शिवसेना भवन’वर आम्ही दावा करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. वरकरणी हा मुद्दा भावनेच्या साच्यात अडकवला जात असला, तरी केवळ तांत्रिक अडचणीमुळेच शिंदे शिवसेनेच्या मुख्यालयावर दावा करणार नाहीत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

( हेही वाचा : कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘चिते की चाल’! दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल)

दादरमधील ‘शिवसेना भवन’ ही इमारत शिवसेना पक्षाच्या नावावर नाही. ती ‘शिवाई ट्रस्ट’च्या नावावर आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू लीलाधर डाके हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. परिणामतः शिवसेना भवनची इमारत ही अधिकृतपणे पक्षाच्या मालकीची नसल्यामुळे तिच्यावर एकनाथ शिंदे दावा करू शकणार नाही, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

‘सामना’ उद्धव ठाकरेंकडेच

शिवसेना पक्षाचे मुखपत्र अशी ओळख असलेले ‘सामना’ हे वृत्तपत्र उद्धव ठाकरेंकडेच राहणार आहे. कारण ते शिवसेना पक्षाच्या मालकीचे नाही. ‘सामना’ हे प्रबोधन प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केले जाते. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सध्या प्रबोधन प्रकाशनची धुरा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.