“उद्धवसाहेब वडिलांची प्रतिष्ठा आणि ठाकरेंचे वलय घालवून तुम्ही काय मिळवलत?” मनसे नेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

142

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला. एकनाथ शिंदेंनी पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दोन्ही मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान या राजकीय परिस्थिबाबत अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मनसे नेते अमेय खोपकर यांनी शेअर केलेला फोटो सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

( हेही वाचा : …म्हणून एकनाथ शिंदे करणार नाहीत ‘शिवसेना भवन’वर दावा! )

अमेय खोपकरांची पोस्ट चर्चेत 

अमेय खोपकर यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली असून यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. या फोटोंच्या खाली मजकूर सुद्धा लिहिलेला आहे. “आमच्या राजसाहेबांना कूटनीतीने शिवसेना मिळवण्यासाठी छळणाऱ्या उद्धव साहेबांकडूनच शिवसेना हिसकावली गेली. समय बडा बलवान होता है उद्धव साहेब वडिलांची प्रतिष्ठा आणि ठाकरेंचे वलय घालवून तुम्ही काय मिळवलत?” ‘आज विश्वास पटला भगवान के घर देर है, अंधेर नही’ असा मजकूर असलेला फोटो अमेर खोपकर यांनी शेअर केला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज ठाकरेंनीही बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं… अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameya Khopkar (@ameyakhopkar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.