आपल्या मुलांना आपल्या चपला होऊ लागल्या की ते मोठे झालेत असं समजावं. कोणत्याही पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं आणि पराक्रम करुन दाखवावा. ज्यावेळी खरोखर असा क्षण येतो त्यावेळी आपण भारावून जातो, आपला आनंद गगनात मावेनासा होतो.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे खरं आहे की काही लोक सोशल मीडियाचा वापर चूकीच्या पद्धतीने करतात. पण असे अनेक लोक आहेत जे इतरांना प्रेरणा देतात. आयपीएस अधिकारी जीपी सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंतवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ पाहून प्रत्येक पित्याला आपल्या मुलीविषयी असाच अभिमान वाटत असणार. जीपी सिंह म्हणाले की, ‘आज सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस ऍकेडमी हैदराबाद येथून पासआऊट झाल्यावर आपल्या मुलीने केलेल्या सॅल्युट स्वीकारला. या क्षणाचं वर्णन मी शब्दांत करु शकत नाही.’
Words fail me. Received the salute from daughter @aishwarya_ips as she passed out of @svpnpahyd today. Picture courtesy @lrbishnoiips pic.twitter.com/aeHoj9msYG
— GP Singh (@gpsinghips) February 11, 2023
हा व्हिडिओ भावूक करणारा आहे त्याचबरोबर अभिमान जागवणारा देखील आहे. वडिल आणि मुलगी दोघांच्याही चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत आहे आणि आयपीएस जीपी सिंह यांच्या चेहर्यावरील भाव सांगत आहेत की त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत आहे. या व्हिडिओला ट्विटरवर २ लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. असा क्षण प्रत्येक वडिलांच्या आयुष्यात येवो.
Join Our WhatsApp Community