धनुष्यबाण चोरणाऱ्याचे वस्त्रहरण करणार; संजय राऊतांचा इशारा

187

आमच्या शिवसेनाप्रमुखांचा धनुष्यबाण चोरीला गेला असून हे चोर कोण आहेत याचा पहिला शोध घेऊन या धनुष्यबाणाची चोरी करणाऱ्यांचे वस्त्रहरण केले जाईल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत हे कोकण दौऱ्यावरून थेट मातोश्रीवर पोहोचले आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना राऊत यांनी हा इशारा दिला.

यामागे दिल्लीतील महाशक्ती हात

संजय राऊत म्हणाले, ‘आमच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आणि भाजपचे नेते आनंद व्यक्त करत आहे, हे काय आहे? असा सवाल करत धनुष्यबाणाचा चोर कोण आहे? याचा शोध आम्ही घेत आहे. दरोडा घालून निवडणूक चिन्हाची चोरी झाली असून यामागे दिल्लीतील महाशक्ती कोण आहे? याचा शोध घेतला जात आहे.’

चोराला पकडून रस्त्यांवर मारल्याशिवाय राहणार नाही

‘महाराष्ट्रात मंदिरांवर दरोडे पडत आहेत. मंदिरातील कलश चोरीला जात आहेत, मूर्ती चोरीला जात आहे, आता तर आम्हा शिवसैनिकांच्या मंदिरातील धनुष्यबाण चोरीला गेला असून हा संशयित चोर कोण आहे? याचा शोध घेण्याचे काम असून हा चोर शोधून त्याला जनतेसामोर आणले जाईल. चोर भेटल्यानंतर जनता त्यांना रस्त्यावर पकडून मारतात तसेच धनुष्यबाण चोराला पकडून रस्त्यांवर मारल्याशिवाय राहणार नाही,’ असाही इशारा राऊत यांनी दिला.

(हेही वाचा – शिवसेना शाखांनाच पोलीस संरक्षण देण्याची आली वेळ!)

शिवसेना हा सामान्य पक्ष नाही. तुम्ही काहीही करा, आम्ही घाबरणारे नाही. ही पार्टी बाळासाहेबांची असून ती पुढेही राहणार आणि मोठी होणार असाही विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला. कितीही आमदार, खासदार गेले तरी फरक पडत नाही असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.