केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका झाली. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे, तसे ट्वीट त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
संजय राऊत यांचे ट्वीट
संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळी लिहिलेल्या आहेत. ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसददेखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे! कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” त्यासोबतच संजय राऊत यांनी कॅप्शनही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत.
( हेही वाचा: शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल )
माझी खात्रीची माहिती आहे….
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023
राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. ब-याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.
Join Our WhatsApp Community