सरकार गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

169

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संभजीराजे छत्रपती आपण केलेल्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतली आहे. कोणत्याही शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही. संभाजीराजे छत्रपती आपण सूचना करा, त्याचा विचार करुन अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने महोत्सवाचे आयोजन केले आहे. अवघा परिसर भगवामय झाला आहे. भगव्याची लाट याठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवरायांचा आदर्श आहे. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: पुढच्या वर्षी कोणाचीही अडवणूक होणार नाही; योग्य पद्धतीने नियोजन होईल; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन )

ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल

आमचे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. या राज्य सरकारने सगळे निर्णय राज्यातील लोकांच्या हिताचे, कष्टक-यांच्या हिताचे घेतले आहेत. सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत जे जे आपल्याला करायचे आहे, ते ते आपण करुयात असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवरायांचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल. यामध्ये सरकार कुठेही हात आखडता घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.