ख्रिस्ती धर्मात आलात तर तुमचे दुःख दूर होईल, असे सांगून केले जाते धर्मांतरण

158

ख्रिस्ती मिशनरी यांनी भारतीय समाजात प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे. एखाद्या धर्माने अधिकृतपणे अंधश्रद्धा जर कुणी पसरवली असेल तर त्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांचा क्रमांक पहिला लागतो. विचित्र आणि विक्षिप्त गोष्टी करुन लोकांना फसवून ते आजही आपली संख्या वाढवत आहेत.

लोहरदगा जिल्ह्यात भयानक गोष्टी घडली होती की, एकाच कुटुंबातील १३ सदस्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. या कुटुंबाचे सदस्य राजेश खलखो यांनी सांगितले की, त्यांचं कुटुंब बर्‍याचदा आजारी असायचं. लोक त्यांच्या कुटुंबापासून दूर राहू लागले होते. यासाठी ते काही उपाय करु लागले, तेव्हा हेसवे गावात गेले असताना ख्रिस्ती लोकांनी सांगितलं की, या समस्येपासून मुक्ती हवी असेल तर ख्रिस्ती पादरीची मदत घेतली पाहिजे.

त्यानुसार २०१२ मध्ये त्यांच्या घरी पादरी आले. त्या पादरीने सांगितलं की, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यावर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. तुम्हाला तुमचा मूळ वनवासी म्हणजेच सरना पंथाचा त्याग करुन ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल. पादरीने त्यांची फसवणूक केली, दुःख दूर करण्याचं आमिष दाखवलं आणि त्यांनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.

(हेही वाचा शिवसेनेच्या ट्वीटर अकाऊंटचे नाव बदलताच Blue Tick गायब; चर्चांना उधाण)

मग या कुटुंबाच्या लक्षात आलं की, मागील ११ वर्षांत त्यांच्या समस्या दूर झाल्याच नाहीत. त्यापेक्षा आपला पूर्वीचा धर्म उत्तम होता अशी जाणीव या कुटुंबाला झाली आणि मग या कुटुंबातील सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा मूळ धर्मात प्रवेश केला. तर ख्रिस्ती मिशनरी अशाप्रकारे लोकांच्या अडचणींचा फायदा घेतात, येशूची मार्केटिंग करतात आणि लोकांना ख्रिस्ती धर्मात येण्यास मजबूर करतात.

त्यामुळे केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या अशा मतांतरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे केवळ मतांतरण करत नाहीत तर अंधश्रद्धा पसरवतात, त्याचबरोबर लोकांच्या दुःखाचा आणि अडचणींचा गैरफायदा घेतात. याचा अर्थ ते लोकांचं मानसिक शोषण करतात. त्यामुळे ह्यांना कायद्याने कठोर शिक्षा व्हायला हवी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.