काही वर्षांपूर्वी सर्वसामान्यांसाठी CCTV कॅमेरे उपलब्ध नव्हते. परंतु आज अनेक सोसायटीमध्ये, इतकंच काय तर लोक स्वतःच्या घरातही CCTV कॅमेरा बसवू लागले आहेत. स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून CCTV कॅमेर्यांचा वापार केला जातो. तसेच पोलिसांनादेखील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी CCTV कॅमेरांचा उपयोग होतो.
मात्र, बर्याचदा रात्रीच्या अंधारातील दृश्य या कॅमेरांमध्ये कैद होत नाही. रात्रीच्या दृश्यांची व्यवस्थित रेकॉर्डिंग होत नाही. म्हणूनच आपल्याला चिंता सतावत राहते. रात्री निश्चिंतपणे झोपता येत नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावर तोडगा कसा काढायचा? असा कोणता कॅमेरा आहे जो रात्रीची दृश्ये कैद करेल? तर आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगणार आहोत. रात्रीची दृश्ये रेकॉर्ड न होण्यामागचं प्रमुख कारण इंफ्रारेड लाईट्सचा अभाव. आपण जे कॅमेरे विकत घेतो त्यात इंफ्रारेड लाईट्स नसतात म्हणून चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग होऊ शकत नाही. परंतु तुमच्या कॅमेरात जर इंफ्रारेड लाईट्स असतील तर तुम्हाला चांगल्या दर्जाचे फुटेज मिळू शकतात आणि तुम्ही रात्री निश्चिंतपणे झोपू शकतात.
( हेही वाचा: तुम्हाला चॉकलेट बंगला माहितीये, आता पहा चॉकलेटचा ‘डायनासोर’ )
आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की असा कॅमेरा खूप महाग येत असणार आणि तुमच्या खिशाला तो परवडणर नाही. तर ही समस्या देखील आम्ही दूर करणार आहोत वाचकांनो, ५० इंचाचा एमआय एलईडी टिव्ही ४ प्रो हा कॅमेरा १० हजारापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. काही लाईट व्हिजन कॅमेरे तुम्हाला ५ ते १० हजारादरम्यान मिळू शकतात. तर वाचकांनो, आता जर CCTV कॅमेरा विकत घ्यायला जाणार असाल तर त्यात इंफ्रारेड लाईट्स आहेत याची खात्री नक्की करा.
Join Our WhatsApp Community