२५ वर्षांत युतीत सडले म्हणणारे अडीच वर्षांत संपले – देवेंद्र फडणवीस

183

आम्ही शिवसेनेसोबत युती करून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढलो, पण निकाल लागल्यावर त्यांना सत्तेची खुर्ची दिसली आणि त्यांनी भाजपाची २५ वर्षांची युती तोडली आणि दोन्ही काँग्रेससोबत सरकार स्थापन केली. २५ वर्षे युतीत सोडलो म्हणाले अडीच वर्षांत संपले, असंगाशी सांग केल्यावर काय होते, हे तुम्ही पाहताच आहात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोल्हापूर येथे ते बोलत होते.

बेईमानी करणा-यांना पुन्हा उठून उभे राहण्याची सोय राहिली नाही

निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेघाण ठेवलेला धनुष्यबाण आपण सोडवला, असे म्हटले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना सुरक्षित झाली, आपल्याशी ज्यांनी बेईमानी केली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही सहा महिन्याआधी केली अशी अवस्था केली कि पुन्हा उठून उभे राहण्याची सोय राहिली नाही. लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, अशी म्हण मागील सरकारने केलेल्या घोषणावरून दिसून येते, अडीच वर्षे महाराष्ट्रात एकही योजना झाली नाही, आता अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करायचे आहे, ट्वेन्टी ट्वेन्टीची मॅच खेळायची आहे. महाविजय, महासंपर्क यात्रा हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवायची आहेत. युवा वॉरियर तयार करायचे आहेत. लोकसभेत यश मिळाले पण विधानसभेत योग्य ते यश कोल्हापुरात मिळाले नव्हते, आता दोन्हीमध्ये १०० टक्के यश मिळवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा वीर सावरकर यांनी शिवरायांवर लिहिलेल्या आरतीचा सावरकर स्मारकाकडून व्हिडिओ प्रसिद्ध)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.