बेडकाने फुगायचा प्रयत्न केला की तो फुटतो, उद्धवजी तुमची तीच अवस्था; भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र

174

शिवसेनेत बंडखोरी झाली आणि राज्याला राजकारणाला वेगळेच वळण आले. काही दिवसांपू्र्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आणि सर्वच स्तरांतून विवध प्रतिक्रिया समोर आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या याच टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना, आशिष शेलार यांनी त्यांना डबक्यातल्या बेडकाची उपमा दिली आहे. तसेच, बेडकाने फुगायचा प्रयत्न केला की तो फुटतो, उद्धवजी तुमची तीच अवस्था झाली आहे, असे म्हणत त्यांच्यावर निशाणाही साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला. ठाकरेंच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यानी उद्धव ठाकरे सत्तापिपासून वृत्तीने वागले, असे म्हटले आहे. तसेच, फोनही घेतले नाहीत. स्वत:च्या विचारांना तिलांजली देऊन हिंदुत्व सोडून हिंदुत्वाशी गद्दारी केली, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल )

यांची अवस्था डबक्यातील बेडकासारखी

आशिष शेलार म्हणाले की, ते डबक्यातले बेडूक आहेच किती फुगलात तरी तु्म्ही मोठे होऊ शकत नाही. बेडकाने फुगायचा प्रयत्न केला की, तो फुटतो, उद्धवजी तुमची आज तीच अवस्था झाली आहे, असे म्हणत अमित शहांवर टीका करणा-या ठाकरेंना आशिष शेलार यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.