राज्यात सध्या परीक्षांचा काळ सुरु आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. आता या परीक्षा सुरु असतानाच, राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे कर्मचारीच नसल्याने काॅलेज बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलन करत आहेत.
विद्यापीठ आणि महाविद्यालय कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासनदेखील देण्यात आले. परंतु, मागण्या मात्र पूर्ण करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या ?
- महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी
- शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
21 फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासून बारावी बोर्डाचच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने या संदर्भात तातडीने लक्ष घालून योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे.
Join Our WhatsApp Community