केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालानंतर राजकीय घडामोडीत वेगानं हालाचाली होत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना आणि ठाकरे गटाला एक सूचक इशारा दिला आहे. ठाकरे गटाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन राहिल्यास आपण एकटे राहू असा थेट इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. अकोल्यातील पत्रकार परिषद आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर नक्की काय म्हणाले?
अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन केलं तर? याच प्रश्नाचं उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, ‘आम्ही पुन्हा एकटे. एक लक्षात घ्या, सेनेसोबत आमची युती झालीये. सेनेनं आम्हाला सांगितलं की, महाविकास आघाडीसोबत आपली युती झाली पाहिजे. तर आम्ही त्याला होय म्हटलं. आता तो बॉल त्यांच्या न्यायालयात आहे.’
(हेही वाचा –‘या’ मुद्द्यावरून लढा, न्याय मिळेल; प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला)
दरम्यान वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घ्यायचं की नाही? याबाबत अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तसंच कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर मविआला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत होते. मात्र दोन्ही पक्षांनी याबाबत विनंती केली नाही. वंचितची आम्हाला आवश्यकता नाही, असं नाना पटोलेंनी वक्तव्य केल्याची माहिती आंबेडकरांनी दिली होती.
Join Our WhatsApp Community