होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर!

212

मुंबईकर चाकरमानी होळी आणि गणपतीच्या सणाला कोकणात मोठ्या संख्येने जातात. यंदाही होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे अतिरिक्त गर्दी कमी करून चाकरमान्यांचा प्रवास सोयीचा होईल.

यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुरथकल या मार्गावर ३ फेब्रुवारीपासून प्रत्येक शुक्रवारी सोडण्यात येत आहे. दर शुक्रवारी लोकमान्य टिळक स्थानकातून रात्री ८.१५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ही गाडी ३.३० वाजता सुरथकल स्थानकावर पोहचेल. होळीसाठी या गाडीचा लाभ घ्यावा असे कोकण रेल्वेने सांगितले आहे.

( हेही वाचा : १२ आमदारांच्या नियुक्ती पत्रावर ‘यामुळे’ मी सही केली नाही; भगतसिंह कोश्यारींचा गौप्यस्फोट )

सुरत ते करमाळी विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर होळी विशेष रेल्वे गाडी वसई, पनवेल, रोहा, रत्नागिरीमार्गे करमाळीला जाणार आहे. ही गाडी स्पेशल फेअर ट्रेन म्हणून चालवली जाणार आहे. सुरतवरून ही ट्रेन ७ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी ही गाडी करमाळीला पोहोचेल.

ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिविम स्थानकावर थांबेल.

पनवेलवरून मडगावसाठी विशेष गाडी

कोकणात जाण्यासाठी पनवेलवरून सुद्धा विशेष गाडी सोडण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१४२९ ही विशेष गाडी रात्री ९.१५ वाजता पनवेल स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा या स्थानकांवर थांबेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.