मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आणखी ५० नवीन संगणक प्रयोगशाळा; २२४ प्रयोगशाळांचे नुतनीकरण होणार

195

मुंबई महापालिकेच्या २२४ संगणक प्रयोगशाळा आता अद्ययावत करून उच्च दर्जाच्या संगणक प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहे. याशिवाय आता महापालिकेच्या ४१ प्राथमिक आणि ९ माध्यमिक शाळांमध्येही नवीन संगणक प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहे. यासाठी तब्बल २२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शैक्षणिक अध्ययनाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सन २०१८-१९ व २०१९-२० मध्ये महापालिकेच्या १९३ प्राथमिक व ३१ माध्यमिक अशाप्रकारे २२४ शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या होत्या. या संगणेक प्रयोगशाळांच्या लाभ महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये होत आहे. या संगणक प्रयोगशाळांमध्ये उभारुन तसेच उच्च तंत्रज्ञानाचा लाभ महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्याच्या हेतून या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात २०२२-२३मध्ये ११२ संगणक प्रयोगशाळांचे अद्ययावत करण्यात येत असून ३८ संगणक प्रयोगशाळांमध्ये अतिरिक्त संगणक खरेदी करण्यात येणार आहे. तर उर्वरीत ११२ संगणक प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत व १२ नवीन संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी संगणकांची खरेदी ही सन २०२३-२४मध्ये करण्यात येणार आहे,असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

या २२४ संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी आणि नवीन ५० संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी संगणक खरेदी करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेमध्ये आजवर अनेक प्रकारची कामे मिळवत वादग्रस्त ठरणारी हाय वे कंस्ट्रक्शन कंपनी ही अपात्र ठरली आहे. निविदेतील अटींची पूर्तता न कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या कंपनीला अप्रतिसादात्मक ठरवण्यात आले. त्यामुळे या निविदेमध्ये आयएनपी कंप्यटर्स ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यमान संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करणे आणि नवीन ५० संगणक शाळा उभारण्यासाठी ४० प्रकारची कामे हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये ५० नवीन संगणकांची खरेदी तसेच वॉल पेंटीग, फ्लोरींग मॅट्स, व्हेंटीलेशन, पडदे, ग्रिलसह सरकत्या खिडक्या, फॉल सिलिंग, शिक्षकांसाठी खुर्ची, शिक्षकांसाठी टेबल, लॉकरसहित कपाट, प्लाय शू रॅक, सूचना फलक, व्हाईट बोर्ड, ब्लॅकबोर्ड, एलईडी ट्यूबलाईट, बाहेर हवा फेकणारा पंखा आदी प्रकारच्या ४० प्रकारची कामे हाती घेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.