हिज्बुल मुजाहिदीनचा टाॅप मोस्ट कमांडर आलम उर्फ बशीर अहमदचा खात्मा

136

हिज्बुल मुजाहिदीनच्या महत्त्वाच्या पाच कमांडर्सपैकी एक असलेला इम्तियाज आलम उर्फ बशीर अहमदचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयसोबत झालेल्या वादानंतर आयएसआयनेच (ISI) त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे. रावळपिंडीमध्ये नमाज पढून मिशीदीतून बाहेर पडल्यानंतर बशीरवर गोळीबार झाला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

इम्तियाज आलम उर्फ बशीर अहमद हा मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य होता आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात बशीर अहमदचा मोठा हात होता. यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित झाल्यानंतर त्याने पाकिस्तानात आसरा घेतला होता. इम्तियाज आलमचे मूळ गाव जम्मू- काश्मीरच्या कुपवडा जिल्ह्यातील बाबरपोरा आहे. परंतु, आलम पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हिज्बुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबासाठी दहशतवादी आणि कॅडेर यांना एकत्र आणण्यासाठी ऑनलाईन प्रचार करत होता.

( हेही वाचा: आमदाराच्या मुलाची सोनू निगमच्या अंगरक्षकासोबत हुज्जत; मध्यरात्री तक्रार दाखल )

काही दिवसांपूर्वीच तीन दहशतवाद्यांना अटक

दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन येथे तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी शोपिया येथील रहिवासी आहे. एम अब्बास वागे, गौहर अहमद मीर आणि निसार अहमद शेख अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.