T-20 Women World Cup: आयर्लंडवर शानदार विजय मिळवत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत

147

ICC आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 18 वा सामना भारत आणि आयर्लंड संघात खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार, 5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना, 20 षटकांत 6 बाद 155 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आयर्लंड संघाला 156 धावांचा पाठलाग करताना पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे 8.2 षटकांत 2 बाद 54 धावाच करता आल्या.

या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने 5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसामुळे व्यत्यय आला. पावसामुळे सामना थांबवण्यापूर्वी 8.2 षटकांत 2 बाद 54 धावाच आयर्लंडला करता आल्या. ज्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार, आयर्लंड संघ टीम इंडियाच्या 5 धावांनी मागे होता. याचाच फटका आयर्लंड संघाला बसला. अशा पद्धतीने भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या.

( हेही वाचा: WTC स्पर्धेतून ‘हा’ संघ बाहेर; कोणत्या दोन टीम होणार अंतिम सामन्यासाठी पात्र? )

स्मृती मंधाना विजयाची शिल्पकार 

स्मृती मंधानाने 56 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. त्याचबरोबर तिने शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.