मराठमोठ्या स्मृती मंधानाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्मृती मंधनाने ICC महिला T-20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करुन इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या महिला T-20 World Cup 2023 मध्ये सोमवारी 20 फेब्रुवारीला आयर्लंडवर विजय मिळवला. डकवर्थ पद्धतीच्याआधारे भारतीय महिला संघाने आयर्लंडचा फज्जा उडवला.
या विजयामुळे भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या मॅच स्मृतीचे शतक हुकले मात्र तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवता आला. मात्र, स्मृतीच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर T-20 World Cup 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला मागे टाकत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
@mandhana_smriti's scintillating innings of 87 off 56 balls helped #TeamIndia book their place in the #WomensT20WorldCup semi-finals! Congratulations to @BCCIWomen on an excellent performance! #INDWvsIREW pic.twitter.com/vW12NXCXrX
— Jay Shah (@JayShah) February 20, 2023
( हेही वाचा: T-20 Women World Cup: आयर्लंडवर शानदार विजय मिळवत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत )
स्मृतीच्या सर्वाधिक धावा
दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करुन करिष्मा केला आहे. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. त्यात स्मृतीने 149 धावा केल्या आहेत. याआधी एलिसाने तीन सामन्यांत 146 धावा केल्या होत्या. यामुळे स्मृतीने एलिसाला मागे टाकले आहे. स्मृतीने सोमवारी चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या खेळीत तिने 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
Join Our WhatsApp Community