विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यलयानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यलयातही शिंदे गटाने प्रवेश मिळवला आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांना ही माहिती दिली आहे. संसद भवनातील १८ क्रमांकाची रुम शिवसेनेला देण्यात आली, असे या पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर, शिंदे गट आता शिवसेनेच्या कार्यालयांत प्रवेश करत आहे.
( हेही वाचा: ठाकरे गटाच्या याचिकेवर आता 22 फेब्रुवारीला होणार सुनावणी )
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
शिवसेना पक्षातील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे- प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community