काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘दादा साहेब फाळके पुरस्कार 2023’ मिळाला आहे. ‘द कश्मीर फाईल्स’सोबतच ‘आरआरआर’ चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला आहे.
“द काश्मिर फाईल्स” फिल्म को दादासाहेब फाळके पुरस्कार से सन्मानित किये जाने पर विवेक अग्निहोत्री और टीम का मनःपूर्वक अभिनंदन…@vivekagnihotri #TheKashmirFiles #DadaSahebPhalkeAwards2023 pic.twitter.com/duovS49eM6
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 21, 2023
सोमवारी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला, त्यात ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सोमवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्याला अनेक चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी हजेरी लावली. ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलागुणांचा गौरव केला जातो.यानिमित्ताने राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटाच्या चमूचे अभिनंदन केले.
Join Our WhatsApp Community