शिवजयंतीला वीर सावरकरांनी रचलेलीच आरती का?

310

दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्मोत्सव जल्लोषात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दुसरीकडे जेएनयूमध्ये डाव्या विचारांच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची बातमी सोशल मीडियावर फिरत होती. या दोन घटना भारतात लोकशाही शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवनेरीवरील कार्यक्रमात स्वा. सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती म्हणण्यात आली. आता मुद्दा असा आहे की, वीर सावरकरांनी रचलेल्या आरतीची निवड का करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी चर्चा करताना दोन प्रमुख गट पडतात. पहिला गट राष्ट्रभक्तांचा आहे आणि दुसरा गट राष्ट्रद्रोह्यांचा आहे.

राष्ट्रद्रोह्यांना अफझलखान आणि औरंगझेब आपलेसे वाटतात आणि राष्ट्रभक्तांचा महाराज आदर्श वाटतात. मात्र हे राष्ट्रद्रोही दहशतवादी अफझलखान किंवा औरंगझेबाची स्तुती करताता ते छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण मानतो असं भासवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहिती आहे की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करता येणार नाही. म्हणूनच त्यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करून सांगितला. मग शिवराय धर्मनिरपेक्ष होते, अफझलखान आपल्या सीमा वाढवायला आला होता जिहाद करायला नव्हे किंवा अफझलखानामुळे छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशाप्रकारचा विचार मांडण्यात येतो.

(हेही वाचा छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?)

या सर्व गोंधळात जर स्वच्छ विचार द्यायचे असतील तर सावरकरांशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सावरकरांची स्पष्ट मते होती. कवी भूषण म्हणतात ’अगर सिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी’ त्याप्रमाणे वीर सावरकर देखील शिवरायांना हिंदुराष्ट्राचे रक्षक मानतात. ’जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणां, आर्या ताराया.’ इतका स्पष्ट उल्लेख या आरतीमध्ये वीर सावरकर करतात.’ तत्कालीन नेत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थित ओळखणारे आणि त्यांच्या मार्गावरुन मार्गक्रमण करणारे वीर सावरकर हे एकमेव होय!

दुसरी गोष्ट शिंदे-फडणवीस सरकारने या कृतीतून कॉंग्रेसच्या मुस्कटात मारली आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी बडबड करुन गेले. पण उद्धव ठाकरे मात्र काहीही करु शकले नाहीत. शिंदेंनी मात्र वीर सावरकरांचा सन्मान राखला असा संदेश यातून जातो. त्याचबरोबर जे शिवरायांचा इतिहास दुषित करुन समोर ठेवतात, त्यांचीही कोंडी यातून झालेली आहे. भविष्यात येणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिवजन्मोत्सव अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आम्ही हिंदुत्वाची कास धरुन विकास करणार आहोत, असा स्पष्ट संदेश या सरकारने दिलेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.