समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पुणे शहरात विविध भागात फ्लो मीटर बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवार २३ फेब्रुवारीला पुणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
( हेही वाचा : अभ्यासाच्या तणावामुळे बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या! पनवेलमधील धक्कादायक घटना)
‘या’ भागात येणार नाही पाणी
- वारजे जलकेंद्र – अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.
- पर्वती एलएलआर – दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ. बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर, वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, एनआयबीएम, साळुंखे विहार
- ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, १५ क्रमांक आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.