भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा होते पाकिस्तानच्या ISI शी संपर्कात! NIA ची धक्कादायक माहिती

157

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील सध्या अटकेत असलेले आरोपी आणि माओवादी गौतम नवलखा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आगे. NIA ने हे आरोपपत्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केले आहे. यामध्ये गौतम नवलखा यांचा पाकिस्तानच्या ISI शी संपर्क होता अशी धक्कादायक माहिती NIA च्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

( हेही वाचा :एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा सुटणार, सवलत मूल्यासह दरमहा मिळणार ३२० कोटी)

याआधी सुद्धा नवलखा यांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन यांच्याशी थेट संबंध आहे असा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. याशिवाय २०११ ते २०१४ मध्ये नवलखा फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी आणि शकील बख्शी यांच्या संपर्कात होते अशी माहितीही अरुणा पै यांनी कोर्टात दिली आहे.

दरम्यान नवलखा यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला विरोध करण्यासाठी NIA ने उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. नवलखा यांचे कृत्य राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि सार्वभौमत्वार थेट परिणाम करणारे आहे असा दावा NIA ने केला आहे.

NIA च्या प्रतिज्ञापत्रात कोणती माहिती?

  • गौतम नवलखा हे CPI माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य होते.
  • शहरी नक्षलवाद प्रकरणी सध्या नजरकैदेत असलेले गौतम नवलखा यांचे पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI शी संबंध होते.
  • नवलखा यांचे कृत्य राष्ट्रीय सुरक्षा, एकता आणि सार्वभौमत्वार थेट परिणाम करणारे असल्यामुळे जामीन अर्जाला विरोध
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.