“पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, समजनेवाले को इशारा काफी है”; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

176

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला आहे. यावर राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केल्यावर एकच खळबळ उडाली. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : गुढीपाडवा आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार )

पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु त्यातून एक फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले को इशारा काफी है असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. चिंचवडमध्ये आगामी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला गेल्यानंचर माध्यामांशी बोलताना पवारांनी शपथविधीबाबत हा गौप्यस्फोट केला आहे.

देश आणि राज्यात अराजकाची स्थिती भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. त्याविरोधात मत मांडण्याची संधी या निवडणुकीने निर्माण केली आहे. ही निवडणूक तरूणांनी हाती घेतली असल्याने या निवडणुकीत नाना काटे यांचा विजय निश्चत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. काटे यांच्या प्रचारार्थ चिंचवड मतदार संघात पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी पवार बोलत होते. ‘देशात जातीय तणाव वाढवायचा. हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा. आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करायची. तोडा आणि फोडा या ब्रिटीशांच्या नितीनुसार राज्य करायचे. या साऱ्या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे त्याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल’ असे शरद पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.