अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली ईडीने माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक यांच्या कोठडीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. बुधवारी पुन्हा त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पाडली. यावेळी ईडीने मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर न्यायालयाने आताही मलिकांचा जामीन अर्ज फेटाळून पुन्हा १४ दिवसांची कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
नवाब मलिकांचे नेमके प्रकरण काय?
महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचा खुलासा झाला होता. हसीन पारकरकडून कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदी कवडीमोल भावात केल्याचा आरोप मलिकांवर ई़डीकडून करण्यात आला होता. या व्यवहारात मलिकांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता. तसेच मलिकांकडून हसीन पारकरने स्वीकारलेले पैसे टेरर फंडिंगसाठी दाऊदने वापरल्याचे, ईडीने सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ नवाब मलिकांना अटक केली होती.
आतापर्यंत मलिकांची किती संपत्ती ईडीकडून जप्त
- कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त
- कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागाही जप्त
- कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स जप्त
- उस्मानाबाद येथील १४८ एकर जमीन जप्त
- वांद्रे पश्चिमेतील २ निवासस्थान जप्त
(हेही वाचा – जुन्या विधानसभा अध्यक्षांना पुन्हा नियुक्त करा, ठाकरे गटाची मागणी; वाचा आतापर्यंतचा युक्तिवाद)
Join Our WhatsApp Community