राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग तिसऱ्या दिवशी सुनावणीला सुरूवात झालेली आहे. ठाकरे गटाकडून गेले दोन दिवस अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून गुरूवारी सुद्धा सुरूवातीच्या काही मिनिटे कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. त्यानंतर ठाकरे गटाकडून अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि अॅड. दत्ता कामत युक्तिवाद करणार आहेत अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
( हेही वाचा : MPSC च्या विद्यार्थ्यांचे चौथ्या दिवशी आंदोलन सुरूच; शिष्टमंडळ-मुख्यमंत्री भेट रद्द)
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे
- एकनाथ शिंदेंच्या सत्ता स्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे.
- राज्यपाल कोणालाही गृहित धरू शकत नाही. राज्यपाल हे घटनात्मक पद त्यांनी सरकार पडण्यापासून वाचवले पाहिजे.
- राज्यपालांनी नियम डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला.
- शिवसेनेचेच सरकार असताना शिवसेनेचे आमदार सत्ता कशी काय पाडू शकतात? शिवसेनेचे आमदार अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात?
- राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरला तर शिंदे सरकार जाईल, त्यांचे निर्णय कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत.
- घटना तयार करणाऱ्यांनी असाही प्रसंग येईल असा विचार केला नव्हता. अशी घटना लोकशाहीत अपेक्षित नव्हती.
- एखादा गट राज्यपालांकडे गेल्यास त्यांना बहुमत चाचणी घेण्यास राज्यपाल मान्यता देऊ शकतात का? असा सवाल सरन्यायाधीसांनी केला. यावर राज्यपाल स्वत:हून बहुमत चाचणी घेऊ शकत नाही असे कपिल सिब्बल म्हणाले.
- अपात्रतेचा मुद्दा निकाली लागल्यानंतरच राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय घ्यायला हवा होता.
- राज्यपालांनी आमदारांची परेड घ्यायला हवी होती का? असा सवाल सरन्यायाधीश चंद्रवूड यांनी केला आहे. यावर राज्यपालांनी मंत्रिमंडळाला विचारूनच अधिवेशन बोलवायला हवे मला वाटले म्हणून केले अशी भूमिका राज्यपाल घेऊ शकत नाही असे कपिल सिब्बल म्हणाले.
- बंडखोर १६ आमदारांना बाजूला ठेऊन घटनापीठाकडून मविआच्या बहुमताच्या आकडेवारीची चाचपणी केली जात आहे.
- अॅड. कपिल सिब्बल यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि अॅड. दत्ता कामत युक्तिवाद करणार आहेत.