जगातील टॉप-25 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर

163

अमेरिकन संस्था हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या विरोधात अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर गौतम अदानींच्या संपत्तीत प्रचंड घट झाली आहे. अदानी उद्योग समुहाचे शेअर्स घसरल्यामुळे जगातील 25 सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर पडले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात अदानी 29 व्या स्थानावर घसरले असून आता त्यांची संपत्ती 42.7 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

( हेही वाचा : पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडांना घेतले ताब्यात )

हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 75 अब्ज डॉलरची घट झाली आहे. यावर्षी सर्वात नुकसान झालेल्या अब्जाधीशांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. यंदा त्यांची एकूण संपत्ती 77.9 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. एक महिन्यापूर्वी गौतम अदानी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. आता 28 अब्जाधीश अदानींच्या पुढे आहेत. गियोव्हेन्नी फेरेरो एन्ड फॅमिली हे अदानींच्या पुढे 28 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 42.9 अब्ज डॉलर आहे. त्याचप्रमाणे फिल नाइट अँड फॅमिली 45.1 अब्ज डालर संपत्तीसह 27 व्या स्थानावर आहेत. मायकेल डेल 48.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 26 व्या क्रमांकावर आहेत.

ब्लूमबर्गच्या यादीनुसार, जगातील 10 श्रीमंतांच्या यादीत सध्या एकही भारतीय नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 81.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 12 व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्गच्या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नल्ट हे 189 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. यानंतर एलन मस्क दुसऱ्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती 183 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.