Whatsapp चॅट करा, पण online दिसू नका; जाणून घ्या सिक्रेट

380

Whatsapp शिवाय आज कोणतंही काम होऊ शकत नाही. Whatsapp ग्रूप्समुळे तर कितीतरी गोष्टी शक्य झाल्या आहेत. एकाच वेळी अनेकांना संदेश पाठवणे सोपं झालंय. १० वर्षांपूर्वी कुणी याचा विचारही करु शकत नव्हतं. मात्र Whatsapp वापरताना एक अडचण नेहमी यायची की तुम्ही ऑनलाईन असता व चॅटिंग करत असता तेव्हा सर्वांना कळतं की तुम्ही ऑनलाईन आहात. मग नको असणार्‍या मेसेजेसचा सुद्धा त्रास व्हायचा.

मग बर्‍याचदा इतरांना कळू नये म्हणून आपण ऑनलाईन येत नाही. मात्र आता या अडचणीवर तोडगा निघाला आहे. तुम्ही ऑनलाईन असाल आणि कुणालाही कळणार नाही. पूर्वी काय व्हायचं की तुम्ही ऑनलाईन असायचा तेव्हा काही लोक तुम्हाला मेसेज करायचे. अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांना प्रत्युत्तर देणं अनिवार्य असायचं, नाहीतर त्यांचा अपमान झाला असा अर्थ निघायचा. आता यापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे.

(हेही वाचा मोदींना हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा; राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील आवाहनाचा फडणवीसांकडून समाचार )

तुम्हाला जर ऑनलाईन स्टेटस दाखवायचा नसेल तर सर्वात आधी तुम्हाला Whatsapp चा अद्ययावत व्हर्जन डाऊनलोड करावा लागेल. आता तुम्हाला उजवीकडे वरच्या बाजूला तीन डॉट्सवर टिचकी मारावी लागेल. त्यानंतर सेटिंग्जमध्ये प्रवेश करा. सेटिंग्जमध्ये प्रायव्हसी पार्यायावर टिचकी मारा. मग लास्ट सीन ऍंड ऑनलाईन वर टिचकी मारा.

मग तुम्ही निर्नय घेऊ शकता की लास्ट सीन कोण पाहू शकतं. तुम्ही Nobody हा पर्याय निवडू शकता. who can see when i’m online मध्ये दोन पर्याय आहेत, जसे की everyone आणि same as last seen. आता तुम्हाला कोणता पर्याय निवडायचाय हा तुमचा प्रश्न आहे. तर वाचकांनो, अशा प्रकारे तुम्ही Whatsapp चॅट करु शकता आणि online दिसण्याचं टेन्शनही तुम्हाला सतावणार नाही. मग कशी वाटली ही ट्रिक?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.