उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; १९ बंगल्यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

126

मुरूडमधील कोर्लई येथे नऊ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे आहे. या जागेमध्ये असलेल्या कथित १९ बंगल्यांबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी लपवून ठेवली असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या सातत्याने करत होते.

( हेही वाचा : Anant Karmuse Beating Case: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश )

ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाबाबत सोमय्या गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असताना अखेर गुरुवार २३ फेब्रुवारीला रेवदंडा पोलीस ठाण्यात संगिता भांगरे यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंचांविरुद्ध फसवणूक, संगनमक, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे परिवारावर १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दबाव आणला आणि अधिकाऱ्यांनी कागदपत्रात छेडछाड केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या म्हणाले, रेवदंडा पोलीस स्टेशन (जिल्हा रायगड) एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ गुन्हा दाखल झाला आहे. संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्‍यांविरुद्ध फसवणूक, संगनमत १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे याप्रकरणी तक्रार नोंदवल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना हिशोब तर द्यावाच लागणार आहे असे टीकास्त्र किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर सोडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.