अखेर एड्सवर सापडले औषध; फ्रान्सच्या डॉक्टरांचा दावा

156

जगभरातील देशांना आजवर औषध सापडले नाही त्या एड्स अर्थात एचआयव्ही वर अखेर रामबाण उपाय सापडला. फ्रान्स देशातील पाश्चर इंस्टिट्यूटच्या डॉक्टरांचा असा दावा आहे की, बोन मॅरो स्टेम सेल ट्रान्सप्लांटमधून एचआयव्ही एड्सच्या पेशंटला पुर्णपणे बरा करण्यात यश आले आहे. एचआयव्हीसाठी 2018 पासून एन्टी रेट्रोवाइरल थेरेपी दिली जाते ती बंद करण्यात आली आहे. या थेरेपीमध्ये चार वर्षापर्यंत एचआयव्ही पेशंट्सची काळजी घेतली जाते. एचआयव्ही ए़ड्स होऊ नये म्हणून योग्य ती काळजीही डॉक्टरांकडून घेतली जाते त्याचबरोबर ही थेरेपी बंद केल्यानंतर डॉक्टरांनी या आजारावरील थेरेपीसाठी अनेक प्रयोग केले आहेत.

बोन मॅरो हे आपल्या हाडांमध्ये असते आणि त्यात स्टेम सेल नावाचा एक पदार्थ असतो ज्याचा वापर या रोगाचा फैलाव शरीरात होण्यापासून रोखला जातो. यातून थैलासीमिया, सिकल सेल एनीमिया, ल्यूकेमिया सारखे रोग हे बरे झाले आहेत. ज्या रूग्णावर हा प्रयोग डॉक्टरांनी केला आहे, त्याला 2008 पासून एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर 3 वर्षांनी त्याला रक्ताचा कर्करोग म्हणजेच एक्यूट माइलॉयड ल्यूकेमिया हा आजार असल्याचेही उघड झाले. 2013 साली म्हणजेच दहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये असलेल्या CCR5 म्यूटेशन जीनमुळे एचआयव्ही एड्स शरीरात पसरण्यापासून थांबवता आला, असे यश पाश्चर इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांना मिळाले आहे.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पहिला व्हर्च्युअल रिअॅलिटी चित्रपट येणार; योगेश सोमण यांचे लेखन, दिग्दर्शन)

बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे स्टेल सेल ट्रान्सप्लांट कधी सुरू झाले? 

2007 मध्ये टिमोथी रे ब्राऊन या व्यक्तीच्या उपचारासाठी पहिल्यांदा या ट्रान्सप्लांटचा उपयोग करण्यात आला होता. यासाठी एका व्यक्तीच्या शरीरातील बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट करावे लागते. ज्यातून एचआयव्ही ए़ड्सचा उपचार करण्यात यश आले आहे. तुम्हाला जर का हे ट्रान्सप्लांट करायचे असेल तर तुमचा सेल हा त्या डॉनरशी मिळता जुळता हवा, त्यातून त्यात ह्यूमन ल्यूकोसाईट एंटीजन (HLA) शी मॅच होणे गरजेचे आहे. त्यातून त्या व्यक्तीच्या शरीरात ही असे आवश्यक राहते ज्याने इम्यून सिस्टम कंट्रोल होते. याचे प्रमाण हे 25 टक्के असणेही आवश्यक आहे. भावांमध्ये 25 तर आई-वडिलांमध्ये 1-3 टक्के असायला हवे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.